Anil Sawant Likely Join Sharad Pawar NCP | शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा पुतण्या राष्ट्रवादीच्या गळाला; तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार?

Tanaji-Sawant-Sharad-Pawar

सोलापूर : Anil Sawant Likely Join Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी इन्कमिंग सुरु झालेली आहे. अनेक नेते तुतारी (Tutari) चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे १० पैकी ८ खासदार निवडून आले. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते शरद पवारांची भेट घेत उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

शरद पवार राज्याचा दौरा करत रणनीती ठरवत असताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि इतर नेते मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. दरम्यान आता राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना आव्हान देण्यासाठी रोहित पवारांनी डाव टाकला आहे. रोहित पवार आणि तानाजी सावंतचे पुतणे अनिल सांवत यांची नुकतीच भेट झाली. अनिल सावंत हे पंढरपूरमधून विधानसभा निवडणूक (Pandharpur Assembly Constituency) लढवण्यास इच्छुक आहेत .

त्यामुळे अनिल सावंत हे रोहित पवारांच्या गळाला लागल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अनिल सावंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बॅनर्सही मंगळवेढ्यात लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर अनिल सावंतांचा भावी आमदार अशा आशयाचा मजकूर लिहीण्यात आला आहे. त्यामुळे अनिल सावंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

अरण येथे झालेल्या एका कार्यक्रमात तानाजी सावंत यांच्यावर रोहित पवारांनी टीका केली होती. महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्यांसारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्य मंत्र्यांच्या विधानसभा निवडणुकीत नांग्या ठेचून काढू, असा घणाघात त्यांनी केला होता.

आरोग्य विभागात हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे, तानाजी सावंत अत्यंत खोटारडा माणूस आहे. अशा लोकांना विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवली जाईल. आता त्यांच्या मतदारसंघात परिवर्तन निश्चित आहे, असा इशाराही रोहित पवारांनी दिला होता.