Swargate Pune Crime News | शर्ट इन न केल्याने शिक्षकांची 11 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण; नाकातून कानातून आले रक्त, पोलिसांनी नोंदविला गुन्हा

Teacher Beats Student

पुणे : Swargate Pune Crime News | कॉम्प्युटर क्लास चालू असताना शर्ट इन का केला नाही, याकारणावरुन शिक्षकाने एका ११ वर्षाच्या मुलाला इतकी मारहाण केली की त्याच्या नाकातून व कानातून रक्तस्त्राव झाला. स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) या शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

संदेश भोसले (वय २६) असे या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी (वय ४४) स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एका शाळेतील ६ वीच्या क्लासरुममध्ये २७ सप्टेंबर रोजी घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा ११ वर्षांचा मुलगा ६ वीमध्ये शिक्षण घेत आहे. क्लास रुममध्ये कॉम्प्युटरचा क्लास चालू असताना कॉम्प्युटरचे शिक्षक संदेश भोसले यांनी इनशर्ट का केले नाही, या कारणावरुन फिर्यादीचे मुलास हाताने बेदम व अमानुष मारहाण केली. त्यामुळे मुलाच्या नाकातून व कानातून रक्तस्त्राव झाला. शाळेतून घरी आल्यानंतर मुलाने त्याच्या आईला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक तानावडे तपास करीत आहे.