Sambhajiraje Chhatrapati On Sharad Pawar | शरद पवारांकडून तिसऱ्या आघाडीबाबत मिश्किल टिप्पणी, संभाजीराजेंचे पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘इतर कोणी असतं तर मी…’

Sambhajiraje Chhatrapati - Sharad Pawar

मुंबई : Sambhajiraje Chhatrapati On Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत. विधानसभेला तिरंगी लढत असणार आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीबाबत घोषणा करण्यात आली आहे.

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu), स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती, भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन नवीन आघाडीबाबत घोषणा केली आहे.

तिसरी आघाडी आकार घेत आहे. तिसऱ्या आघाडीचा (Maharashtra Third Front) आगामी विधानसभा निवडणुकीत काही परिणाम दिसेल का, असा प्रश्न माध्यमांनी शरद पवार यांना विचारला होता. राज्यात निर्माण होऊ पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडविताना पवार म्हणाले, ” मोठ्या ताकदीचे नेते असा प्रयत्न करत आहेत. राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत.

कधीही जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम होणार. संभाजीराजे वगैरे एकत्र आल्यामुळे नक्कीच परिणाम होणार. त्यामुळे आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता आपले काय होणार असा प्रश्न आम्हाला पडला आहे”, असा चिमटा काढत पवारांनी मिश्किल टिप्पणी केली होती.

यावर आज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे. इतर कोणी असतं तर मी खपवून घेतलं नसतं, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. महात्मा गांधी कायम म्हणायचे आधी दुर्लक्ष करतील, मग टिंगल करतील आणि मग ते लढतील नंतर तुम्ही जिंकाल. हे महात्मा गांधींचं प्रसिद्ध वाक्य सांगत संभाजीराजेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.