Prabhat Road Pune Crime News | धक्कादायक ! क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आई माला यांनी स्वतःचा गळा चिरून घेतला; पुण्यातील प्रभात रोडवरील घटना

पुणे : Prabhat Road Pune Crime News | प्रभात रोड येथे राहणाऱ्या क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा मृत्यु झाला आहे. राहत्या घरात त्या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Deccan Pune Crime News)

माला अशोक अंकोला Mala Ashok Ankola (वय ७७, रा. प्रभात रोड) असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माला अंकोला या एकट्याच राहतात. आज सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या घरी काम करणारी महिला आली. त्यांच्या रुमचा दरवाजा बंद होता. त्यांनी बर्‍याच वेळा आवाजा दिला तरी आतून रुम उघडली नाही. तेव्हा त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तेव्हा माला अंकोला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांना तातडीने पूना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचाराअगोदरच मृत घोषित केले. (Former cricketer Salil Ankola’s mother dies in Pune)

माला अंकोला यांनी स्वत:च गळा चिरुन घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली असून तपास सुरु असल्याचे डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीजा निंबाळकर (PI Girija Nimbalkar) यांनी सांगितले.