Kondhwa Pune Crime News | कोंढव्यात अल्पवयीन मुलाबरोबर अनैसर्गिक अत्याचार

Pune-Crime-News-2

पुणे : Kondhwa Pune Crime News | बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्काराची (Gang Rape In Bopdev Ghat Pune) घटना ताजी असतानाच कोंढव्यातच आणखी एक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलांनी अश्लिल व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे एका ५ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Atrocities) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी मुलाच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये वारंवार झाला आहे. याबाबत पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. फिर्यादी यांचा छोटा ५ वर्षाचा मुलगा सोसायटीतील मुलांबरोबर खेळत होता. त्यावेळी मोबाईल मधील अश्लिल व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओप्रमाणे अल्पवयीन मुलांनी फिर्यादीच्या मुलाचे कपडे काढून त्यांच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. तिन्ही मुलांनी हे कृत्य त्यांच्या मोठा मुलासमोर वारंवार केले. या मुलाच्या पालकांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.