Sinhagad Road Pune Crime News | हॉटेल व्यावसायिकाला हप्ता मागून जबरदस्तीने नेले खंबे ! बार तोडून टाकण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | दर महिन्याला १० हजार रुपये हप्ता व दारू देण्याची मागणी करुन जबरदस्तीने हॉटेलमधून खंबे घेऊन जाण्याचा प्रकार समोर आला आहे. (Robbery Case)
याप्रकरणी महेश मुरलीधर शिंदे (वय ५०, रा. सहकारनगर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रविण ऊर्फ हसम्या ढाकणे, विकास कांबळे, आनंदया वाकुंडे व इतर साथीदार (सर्व रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव बुद्रुक येथील मीनाक्षीपुरम येथील यारा रेस्टो अँड बारमध्ये ५ जानेवारी २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान घडला. (Extortion Case)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे यारा रेस्टो अँड बार आहे़ आरोपी हे वेळोवेळी येऊन दारू व दर महा १० हजार रुपये हप्त्यांची वारंवार मागणी केली. दारु व हप्ता न दिल्यामुळे आरोपींनी फिर्यादीवर धारदार हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केला. विकास कांबळे याने काऊंटरवर ठेवलेली काचेची बाटली उचलून फिर्यादीच्या डोक्याच्या दिशेने फेकून मारली. हॉटेलमधील रॉयल स्टँग दारुचे दोन खंबे घेऊन गेले. त्यानंतर काही दिवसांनी प्रविण ढाकणेने फिर्यादीला हॉटेलच्या बाहेर बोलावले. “तुला लय मस्ती आली आहे का, काय रे तुला सांगून देखील तू मला हप्ता आणि दारु देत नाही़ आत येऊन तुझा बारच तोडून फोडून टाकतो,” अशी धमकी देऊन हातातील कोयता हवेत फिरवत दहशत पसरवली. त्यामुळे बारच्या बाजूला असलेला हातगाडीवाला त्याची गाडी टाकून पळून गेला. तसेच येणारे, जाणारे दुचाकीस्वार हे निघून गेले.