Shirur Pune Crime News | शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथे चंदन चोराचा धुमाकूळ ! चोरांच्या हल्ल्यात महिलेसह 3 जण जखमी

शिक्रापूर : (सचिन धुमाळ) – Shirur Pune Crime News | शिरूर तालुक्याच्या वाजेवाडी (Wajewadi Shirur) परिसरात मागील दोन दिवसापासून चंदन चोरांचा (Sandalwood Thief) धुमाकूळ सुरू असून या चंदन चोराच्या धुमाकूळा मध्ये तीन जण जखमी झाले आहेत
वाजे वाडी परिसरात चंदन चोरी करण्यासाठी आलेल्या चंदन चोरांना स्थानिक नागरिकांनी विरोध केला असता चंदन चोरांकडे असलेल्या गलोरीच्या माध्यमातून दगड मारणात आले. यामध्ये दगड लागून सुरेखा पवार, संकेत पवार, अभिषेक डांगले जखमी झाले आहेत,या चंदन चोरामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तर पोलिसांकडून वेळेवर मदत न पोचल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप करण्यात आला आहे.