Pune Crime News | तारा कंस्ट्रक्शनच्या मालकांबरोबर लोकांचीही प्रमोद दोडकेने केली फसवणूक; पाचवा गुन्हा दाखल

Cheating

पुणे : Pune Crime News | तारा कंस्ट्रक्शनच्या मालकांशी झालेल्या करारानुसार दिलेल्या फ्लॅटची कुलूपे एक्सा ब्लेडने कापून परस्पर फ्लॅट बळकाविणार्‍या प्रमोद दोडके याने ग्राहकांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत तानाजी आबा घाटगे (वय ६९, रा. तोडकर रेसिडेन्सी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद विश्वनाथ दोडके Pramod Vishwanath Dodke (वय ५६, रा. स्प्रिंग फिल्ड सोसायटी, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१६ पासून आतापर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील तार कन्ट्रक्शन यांचे वेस्ट ब्रुक या प्रकल्पामध्ये फिर्यादी यांनी फ्लॅट नोंदविला होता. या व्यवहारापोटी त्यांनी अ‍ॅड. साळुंके यांच्याकडे जाऊन नोटराईज समजुतीचा करारनामा व दुय्यम निबंधक कार्यालयात २७ नोव्हेबर २०२० नोदी नोंदणीकृत अ‍ॅग्रीमेंट टू सेल केले होते. त्यात फ्लॅट व कव्हर्ड पार्किंग या करीता ४३ लाख ४८ हजार २३ रुपये ऑनलाईन पद्धतीने दिले होते. त्यानंतरही त्यांनी फ्लॅटचा ताबा मागितला असता त्यांनी दिला नाही. वेळप्रसंगी त्याने दमदाटी व शिवीगाळ केली. खोटी आश्वासने देऊन विश्वासघात केला. सहायक पोलीस निरीक्षक भाबड तपास करीत आहेत.

प्रमोद दोडके याने अनेकांची फसवणूक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात यापूर्वी त्याच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल असून सहकारनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तारा कन्ट्रक्शनचे दिलीप ठाकूर यांना जागा विकसित केल्यानंतर विक्रीसाठी फ्लॅट दिले होते. तरीही जागा मालक प्रमोद दोडके याने बनावट दस्त करुन फ्लॅटची विक्री केली. हे फ्लॅट तारा कन्ट्रक्शनच्या ताब्यात असतानाही त्याने फ्लॅटच्या दरवाजाची बनावट चावी बनवून नवीन लावलेले कुलूप हेक्सा ब्लेडने कापून फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेतला होता. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.