Pune Crime Branch News | गांजा विक्री करत असलेला गुन्हेगार जेरबंद ! अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जप्त केला गांजा

पुणे : Pune Crime Branch News | भवानी पेठेत (Bhavani Peth Pune) गांजा विक्री (Ganja Selling Case) करत असलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. इसाक जैनुद्दीन शेख (वय ५३, रा. चमडी गल्ली, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ऑक्टोंबर रोजी गस्त घालत असताना त्यांना भवानी पेठेतील एक जण संशयितरित्या उभा असलेला दिसला. कोणाची तरी वाट पहात असल्यासारखे दिसत होते. त्याच्या हातामध्ये नायलॉनची पिशवी होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तो काही बोलत नव्हता. त्याच्याकडील नायलॉनच्या पिशवीत १८ हजार १६० रुपयांचा ९०८ ग्रॅम गांजा आणि गांजा विक्रीतून आलेले ११ हजार १५० रुपये, छोट्या १५ प्लॅस्टिकच्या पिशव्या असा २९ हजार ३१० रुपयांचा माल आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम (PI Ulhas Kadam), सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (API Rajkumar Kendre), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे (PSI Digambar Kokate), पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घोरपउे, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, विपुल गायकवाड, नुतन वारे व योगेश मोहिते यांनी केली आहे.