Narhari Zirwal Jumps From Mantralaya | नरहरी झिरवळांसह इतर आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; मंत्रालयात मोठा गोंधळ; जाणून घ्या (Video)

Narhari Zirwal Jumps From Mantralaya

मुंबई : Narhari Zirwal Jumps From Mantralaya | आदिवासी आरक्षणात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये अशी मागणी करत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्यासह इतर आमदारांनी मंत्रालयातून जाळीवर उड्या मारल्या आहेत त्यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

राज्य सरकारकडून धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar GR) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का? असा सवाल उपस्थित करत विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

दोन दिवसांपूर्वी आदिवासी समाजाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र दोन तास वाट पाहूनही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे हे आमदार संतापले होते. दरम्यान या आमदारांना जाळीतून बाहेर काढण्यात आले आहे. झिरवळ यांचा रक्तदाब वाढला होता. अशा अवस्थेतही ते मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यासाठी आग्रही आहेत.