Stamp Duty Rates | आता स्टॅम्प ड्युटीसाठी 100 ऐवजी 500 रुपये द्यावे लागणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय; विविध योजनांचा तिजोरीवर भार?

Stamp

मुंबई : Stamp Duty Rates | राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्याही दस्तऐवजांची नोंदणी १०० मध्ये केली जाणार नाही. अगोदर कागदपत्रांच्या नोंदणीसाठी किमान रक्कम १०० रुपये आकारली जात होती. दरम्यान आता मंत्रिमंडळाने निवडक मालमत्ता व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्क दरांमध्ये सुधारणा जाहीर केली आहे.

कामाचे कंत्राट, भूखंडांचे एकत्रीकरण, पुनर्रचना, विभागणी आणि विलीनीकरणासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय महायुती सरकारने (Mahayuti Govt) घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने असेही म्हटले आहे की, कोणत्याही दस्तऐवजाची नोंदणी १०० मध्ये केली जाणार नाही. अगोदर कागदपत्रांच्या नोंदणीसाठी आकारली जाणारी किमान रक्कम १०० रुपये होती.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याची मांडणी अर्थतज्ज्ञांनी अनेकदा केली आहे. तेच चित्र आता समोर येताना दिसत आहे.

दरम्यान आता महायुती सरकारकडून मुद्रांक शुल्क १०० वरून ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांशी संबंधित कागदपत्रांच्या नोंदणीच्या बाबतीत हे लागू होईल. याचा अर्थ असा आहे की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेवर १०० चे मुद्रांक शुल्क आता ५०० आकारले जाईल.

कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनसाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क सध्याच्या ५० लाखांऐवजी जास्तीत जास्त १ कोटींसाठी पूर्वीच्या ०.२% वरून ०.३% वाढवण्याचा प्रस्ताव आहे, असेही त्यात म्हटले आहे.

मुद्रांक शुल्काचा स्लॅब शहरानुसार वेगळा असतो. मालमत्ता खरेदीसाठी नोंदणी शुल्क ३० लाखांपर्यंतच्या मालमत्तेसाठी एक टक्के किंवा ३० लाखांपेक्षा जास्त मालमत्तेसाठी ३०,००० आहे. सरकारने महसुली वाढीसाठी मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, असे सरकारने सांगितले आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते. दस्त प्रकारांमध्ये सोपेपणा व नेमकेपणा आणून व्यवसाय सुलभता आणणे, दर रचनेत सुटसुटीतपणा आणणे यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे वर्षाकाठी शंभर ते दिडशे कोटी महसूल वाढ होईल असा अंदाज आहे.

गृहखरेदीदारांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात कोणताही बदल होणार नाही. सध्या मुंबईतील घर खरेदी करणाऱ्यांना एकूण मालमत्तेच्या किमतीच्या ६ % मुद्रांक शुल्क भरावे लागते आणि महिला गृहखरेदी करणाऱ्यांसाठी ते ५ % आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.