Gunaratna Sadavarte | विधानसभेला आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीकडून ऍड. गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरणार? मनसेकडून अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा

मुंबई : Gunaratna Sadavarte | वरळी विधानसभा मतदारसंघातून (Worli Assembly Constituency) निवडणूक लढवण्यासाठी ऍड गुणरत्न सदावर्ते इच्छुक आहेत. या मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात (Aaditya Thackeray) लढण्यासाठी महायुतीतील (Mahayuti) शिवसेना (Shivsena Shinde Group) आणि भाजपकडून (BJP) उमेदवारी मिळण्यासाठी सदावर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीमध्ये सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरेंनी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांचे तोंडभरुन कौतुक केले होते. तर दुसरीकडे राजे ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील वरळीतून विधानसभा लढवू शकतात, असेही बोलले जात आहे. दरम्यान, आता वरळीतून गुणरत्न सदावर्ते हे लढणार असल्याने वरळी विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकी आदित्य ठाकरेंनी मोठा विजय मिळवला होता. दरम्यान विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Govt) आदित्य ठाकरे मंत्री देखील झाले होते.
त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर महायुतीकडून वकील गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.