Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्राची भांडणे सोडविण्यास गेलेल्या रिक्षाचालकाला कोयत्याने वार करुन खुन करण्याचा प्रयत्न
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्राला मारहाण होत असताना त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला टोळक्याने आमच्या भांडणामध्ये पडतोस मी त्याला मारणार होतो, आता तुलाच संपवितो, असे म्हणून कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Attempt To Murder)
याबाबत व्हेलारे जेकब अॅन्थनी (वय २५, रा. संजय पार्क, विश्रांतवाडी) यांनी सांगवी पोलिसांकडे (Sangvi Police)फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विघ्नेश गुणशिलन रंगम (वय २५) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार आखिल ऊर्फ भोल्या आणि चिराग घागड यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथील मोरया पार्कमध्ये २९ सप्टेबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र सोहेल मुलाणी हे रिक्षातून जात होते. सोहेल याच्यासोबत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी सोहेल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेले. तेव्हा त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन आमच्या भांंडणामध्ये पडतोस मी त्याला मारणार होतो, आता तुलाच संपवितो, असे बोलून विघ्नेश रंगम याने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीवर वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक भिमसेन शिखरे तपास करीत आहेत.