Pune Crime Branch News | बिबवेवाडी : टेम्पोतून गुटखा घेऊन जाणार्‍याकडून 5 लाखांचा गुटखा जप्त

पुणे : Pune Crime Branch News | पेगो टेम्पोतून गुटखा (Gutkha) घेऊन जात असलेल्या तरुणाकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. अक्षय तुकाराम सुरवसे (वय ३०, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंंद्रे व त्यांचे सहकारी ३० सप्टेंबर रोजी बिबवेवाडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. सुखसागर नगर येथे ते आले असताना एक तीन चकी पेगो टेम्पो वेगाने जात असताना दिसला. या गाडीचा संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करुन टेम्पो थांबविला. टेम्पो चालक अक्षय सुरवसे याच्याकडे चौकशी केल्यावर तो काही उत्तरे देत नव्हता. तेव्हा टेम्पोची तपासणी केली. त्यात गुटख्याची पाकिटे आढळून आली. पोलिसांनी ४ लाख ७९ हजार ६०० रुपयांचा गुटखा व ५० हजार रुपयांचा टेम्पो असा ५ लाख २९ हजार ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे. अक्षय सुरवसे याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, दयानंद तेलंगेपाटील यांनी केली आहे.