Hadapsar Pune Crime News | 14 वर्षाच्या गतीमंद मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास अटक

पुणे : Hadapsar Pune Crime News | घरात एकटी असताना गतीमंद असलेल्या १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape Case) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
शफिक शौकत अन्सारी (वय ४२, रा. नाईकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार २९ सप्टेबर रोजी दुपारी चार वाजता घडला.
याबाबत एका ५५ वर्षाच्या आजीने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षाची नात एकटीच घरी होती. तिची समजशक्ती कमी आहे. असे असताना शफिक अन्सारी हा घरात शिरला. त्याने घराच्या दाराची कडी आतून लावून घेतली. १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. हडपसर पोलिसांनी पोक्सो सह अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून अन्सारीला अटक केली आहे, सहायक पोलीस आयुक्त राख (ACP Ashwini Rakh) तपास करीत आहेत.