Swargate-Bibvewadi Pune Crime News | रात्रीच्या वेळी शेअर रिक्षाने जाताय, सावधान ! शेअर रिक्षाने जाणार्या तरुणाला लुबाडले

मोबाईल, चांदीची चैन जबरदस्तीने घेतली काढून
पुणे : Swargate-Bibvewadi Pune Crime News | स्वारगेटहून बिबवेवाडी येथे जाण्यासाठी रात्री शेअर रिक्षाने जाणार्या तरुणाला रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी मारहाण करुन लुबाडले. (Robbery Case)
याबाबत अमृत वसंत पवार (वय २३, रा. विघ्नहर्तानगर, बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलिसांकडे (Swargate Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बिगारी काम करत असून ते मुळचे तेलंगणातील राहणारे आहेत. २७ सप्टेबर रोजी दाजी अनिल राठोड यांच्यासह सिंहगड रोड (Sinhagad Road) येथील काम संपवून ते रात्री साडेनऊ वाजता बसने स्वारगेटला आले. त्यानंतर राठोड यांनी फिर्यादी यांना शेअरमध्ये बसवून दिले. रिक्षाचालकाने त्यांना आपल्या शेजारी बसविले. रिक्षा लक्ष्मीनारायण चौकात आली असता रिक्षामधील एक प्रवासी उतरला. त्याने त्यो रिक्षा वळवून घेतली. तेव्हा मागे बसलेल्या प्रवाशाने फिर्यादीचा मोबाईल घेऊन त्यावर वरुन कोणातरी शिवीगाळ करु लागला.
तेव्हा फिर्यादी यांनी माझ्या मोबाईलवरुन शिवीगाळ कशाला करता़ मोबाईल परत द्या. तेव्हा त्याने मोबाईल परत हवा असेल तर ५ हजार रुपये द्या अशी मागणी केली. फिर्यादी यांनी त्यांच्याजवळील पाचशे रुपये दिले. त्यानंतर सासर्यांकडून ४ हजार रुपये मागवून घेतले. रिक्षाचालकाने त्यांचा मोबाईल घेऊन सर्व पासवर्ड विचारुन घेतले. रिक्षा चालू असताना मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील चांदीची चैन जबरदस्तीने काढून देण्यास भाग पाडले. रिक्षा लुल्लानगर पुलाजवळ आली असता रिक्षा थांबवून रोडच्या दुसर्या बाजूला असणार्या टपरीकडे इशारा करुन त्या ठिकाणी जा. माझा मित्र थांबलेला आहे. त्याच्याकडून २ हजार रुपये घेऊन ये, असे सांगितले. त्याव्रमाणे फिर्यादी रिक्षातून उतरुन रस्ता क्रॉस करुन जात असताना रिक्षाचालक व त्याचे साथीदार पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे तपास करीत आहेत.