Maharashtra Politics News | विधानसभेच्या तोंडावर बडा नेता अजित पवारांची साथ सोडणार; शरद पवारांच्या भेटीत खलबतं

Sharad-Pawar-Ajit-Pawar-NCP

सोलापूर : Maharashtra Politics News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजेल, असे संकेत आयोगाने दिले.

या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीची ९० टक्के जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे जागावाटपाबाबतची घोषणा करतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

राजकारणात जेवढे भूकंप व्हायचे होते ते होऊन गेले. आता एकच भूकंप व्हायचा बाकी असून, तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत महायुती प्रचंड ताकदीने सत्तेमध्ये येईल. या भूकंपाचे हादरे अनेक वर्षे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांना बसतील, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

मात्र आता याउलट महायुतीलाच धक्के बसत असल्याचे चित्र आहे. कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार बबन शिंदे (MLA Baban Shinde) हे हातातून घड्याळ काढत तुतारी (Tutari) हाती घेणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

बबन शिंदे यांनी आज सकाळी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहेत. लवकरच ते मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्यामध्ये बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा देखील ते पुन्हा शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू होती. आता पुन्हा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे त्यांची घरवापसी निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

माढा विधानसभा (Madha Assembly) मतदारसंघामध्ये काका-पुतण्यामध्ये संघर्ष पहायला मिळणार आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात पुतण्याने दंड थोपटले आहेत. धनराज शिंदे (Dhanraj Shinde) यांनी नुकतीच विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा केली. मानेगाव येथे धनराज शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला.

या कार्यकर्ता मेळाव्यात निवडणूक लढवण्याची मोठी घोषणा धनराज शिंदे यांनी केली. घरातूनच आमदार शिंदे यांना मोठा विरोध असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत. बबनराव शिंदे हे जर शरद पवार गटामध्ये गेले तर अजित पवारांचं देखील टेन्शन वाढणार आहे.