Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’
पुणे : Supriya Sule On Mahayuti Govt | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) लगबग सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी रणनीती आखत तयारी सुरु केली आहे. नेत्यांचे दौरे सुरु आहेत. दरम्यान इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
अशातच आता मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीच्या निकालाची सर्वत्र चर्चा आहे. पक्षात बंड होऊनही शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) युवासेनेने आपले वर्चस्व कायम ठेवत १० पैकी १० जागा जिंकल्या आहेत. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला एकही जागा मिळवता आली नाही.
https://www.instagram.com/p/DAbNTlOJNGm/
यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युवासेनेचे कौतुक करत राज्यातील सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरल्या आहेत. पण जेंव्हा या निवडणुका होतील तेंव्हा जनता चोख उत्तर देईल”, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. ही निवडणूक सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरलेल्या आहेत. जेव्हा या निवडणुका होतील तेंव्हा जनता त्यांना चोख उत्तर देईल. युवासेना आणि सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.