Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार गुंड खुशाल फिरताहेत शहरात खुलेआम ! एकाच दिवशी दोघा तडीपारांना पकडले

Tadipar

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले असतानाही गुंड त्या आदेशाला न जुमानता खुशाल शहरात फिरत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) एकाच दिवशी तडीपार केलेल्या दोघा गुंडांना कोयता घेऊन फिरताना पकडले. (Tadipar Criminal Arrested)

अर्जुन ज्ञानदेव मडके (वय २३, रा. श्रीनाथ रेसिडेन्सी, भुगाव) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. अजुृन मडके याला पिंपरी चिंचवड, पुणे शहर व जिल्ह्यातून १७ जून २०२४ रोजी एक वर्षासाठी तडीपार केले आहे. असे असताना तो कोणतीही परवानगी न घेता बावधन येथील नॅचरल आईस्क्रीम येथे आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला जाऊन पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले (API Prashant Mahale) तपास करीत आहेत.

अमर राघु टेमघरे (वय २३, रा. भाऊ कॉम्प्लेक्स, भुगाव) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. अमर टेमघरे याला २१ जून २०२४ रोजी एक वर्षासाठी पिंपरी चिंचवड, पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असे असताना तो बापुजीबुवा मंदिर येथे थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली असता पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी काही अंतरावर त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.