Loni Kalbhor Pune Crime News | पळून जाऊन लग्न करण्यासाठी मित्राला मदत करणार्‍या दोघांचे मुलीच्या नातेवाईकांकडून अपहरण, केली मारहाण

kidnapping

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | सातारा येथून पहाटे मुलीला पळवून आणून तिचे मित्राबरोबर लग्न लावून दिले. दोघेही पळून गेले. मित्राला लग्न लावण्यात मदत करणार्‍या दोघांचे मुलीच्या नातेवाईकांनी अपहरण केले (Kidnapping Cases). त्यांना बेदम मारहाण (Bedum Marhan) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत प्रतिक वसंत विभुते (वय २३, रा. स्वप्नलोक, हांडेवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित मांडवे, ओंकार गुरव, आकाश मांडवे, प्रकाश मांडवे, कविश्वर मांडवे, अजय मांडवे, चंद्रकांत मांडवे (सर्व रा. कुमठेनागाची, ता. खटाव, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हांडेवाडी येथील स्वप्नलोक सोसायटी व खटाव तालुक्यातील कुमठे नागाची येथे २६ सप्टेबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. त्यांचा मित्र सुमित विकास माने याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहेत. या तरुणीच्या घराच्यांचा लग्नाला विरोध होता. त्यांचे लग्न लावण्यास मदत करण्याचा निर्णय फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी घेतला. त्यासाठी ते सातार्‍याला गेले. त्यांनी पहाटेच्या सुमारास या तरुणीला पळवून आणले. त्यानंतर ते दोघेही दुसरीकडे निघून गेले. या तरुणीचे भाऊ, नातेवाईक हे तिचा शोध घेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास ते सौरभ चव्हाण व ऋषीकेश मांडवे यांना घेऊन तिचे भाऊ व नातेवाईक फिर्यादीच्या सोसायटीत आले. फिर्यादी यांना खाली बोलावले. सुमित माने व आमची बहिण कोठे आहे, याची चौकशी करु लागले. तेव्हा फिर्यादी यांनी मला माहिती नाही, असे सांगितले.

त्यावर चिडून जाऊन त्यांनी कमरेच्या पट्याने व फायबर पाईपाने फिर्यादी व त्यांचे मित्र यांना हाताने मारहाण केली. त्यांच्याकडील क्रेटा गाडीतून फिर्यादी व ऋषीकेश मांडवे यांना जबरदस्तीने बसवून अपहरण केले. तुम्हाला औंध पोलीस स्टेशनला घेऊन जातो, असे सांगून त्यांना कुमठेनागाचे येथे घेऊन गेले. तेथील चौकात असलेल्या राजमुद्रा गणेश मंडळ येथील पत्र्याचे शेडमध्ये नेऊन बसविले. त्यांना पट्याने, काठीने आणि अ‍ॅल्युमिनियमच्या वायरने पुन्हा मारहाण केली. ते दोघे कोठे पळून गेले, याची याना माहिती नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना गाडीत बसवून सोडून दिले. फिर्यादी व त्यांचे मित्र पुण्यात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक नलावडे तपास करीत आहेत.