Loni Kalbhor Pune Crime News | अश्लिल भाषेत कोणाशी बोलतो, याचा जाब विचारल्याने प्रियकराने केली मारहाण

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | हॉटेलमध्ये दारू पित बसलेला असताना फोनवर कोणाशी तरी अश्लिल भाषेत बोलणार्या प्रियकराला महिलेने कोणाशी बोलतो, असे विचारल्याचा राग येऊन त्याने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधील प्लास्टीकची खुर्ची मारुन जखमी केले.
याबाबत ३६ वर्षाच्या विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अविनाश बबन गिरी (वय ३४, रा. तरडे, ता. हवेली) याला अटक केली आहे. हा प्रकार कुंजीरवाडी येथील हॉटेल ग्रँड ७७ मध्ये गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून त्यांना दोन मुले आहे. त्यांचे आणि अविनाश गिरी याचे गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. गुरुवारी दुपारी त्या कॅब करुन अविनाश गिरी याला भेटायला जात होत्या. तेव्हा ग्रॅन्ड ७७ हॉटेल बाहेर त्यांना अविनाश गिरी याची गाडी दिसली. म्हणून त्या हॉटेलमध्ये गेल्या. त्यावेळी तो तेथे बसून दारु पित होता. फोनवर कोणाशी तरी अश्लिल बोलत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला कोणाबरोबर असे घाणेरडेपणे बोलतोयस, असे विचारले. त्यावर त्याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथे असलेली प्लास्टिकची खुर्चीने मारहाण केली. फिर्यादी यांच्या हाताच्या अंगठ्याजवळ दुखापत झाली. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अविनाश गिरी याला अटक केली असून पोलीस अंमलदार करे तपास करीत आहेत.