Pune District Court To Swargate Metro | ‘उद्या या मार्गावर मेट्रो सुरु न केल्यास…’ काँग्रेसने दिला इशारा; पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याने राजकारण रंगलं

Pune-Metro

पुणे : Pune District Court To Swargate Metro | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित आजचा पुणे दौरा रद्द झाल्याने राजकारण रंगले आहे (PM Modi’s visit cancelled) . मोदींच्या हस्ते स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे आज उदघाटन करण्यात येणार होते. पाऊस आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने पंतप्रधान मोदींचा नियोजित पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती आहे.

दरम्यान शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्ग आज सुरु झाला नाही तर शुक्रवारी या मार्गाचे औपचारिक उदघाटन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात येईल. या मार्गावर मेट्रो सुरु न केल्यास मेट्रो अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), माजी शहराध्यक्ष ऍड. अभय छाजेड, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रोच्या टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनाला येत आहेत या कार्यक्रमांमुळे कोट्यावधींचा चुराडा होत आहे. हा कार्यक्रम रद्द झाला असला तरी कोट्यावधींचा चुराडा या दौऱ्याच्या निमित्ताने झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यालयात बसून हे उद्घाटन करता आले असते यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारे उद्घाटन केली आहे.

आता राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा आणि पुन्हा एकदा कार्यक्रम घेऊन लोकांच्या पैशाचा चुराडा करू नये अशी मागणी सरकारकडे धंगेकर यांनी केले आहे.

मेट्रोमध्ये जे पक्षीय राजकारण सुरू आहे. ते अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेस पक्षाने मेट्रोचा डीपीआर केला. मेट्रोची सुरुवात देखील काँग्रेसने केली. मात्र कधीही जाहिरात बाजी केली नाही. त्यामुळे आता भाजप सरकारनेही जाहिरातीवर होणारा खर्च टाळावा आणि टप्प्याटप्प्याने उद्घाटनासाठी पंतप्रधानांना न बोलावता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन करावीत, असे धंगेकर यांनी सांगितले.