Kothrud Pune Crime News | 50 वर्षाच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने केली मारहाण ! पत्नीचे दोन्ही हात केले फ्रॅक्चर, कोथरुडमधील घटना

पुणे : Kothrud Pune Crime News | वयाची ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही पती पत्नीच्या चारित्र्याचा संशय (Character Doubts On Wife) घेत होता. तसेच जुन्या भांडणावरुन त्याने शिवीगाळ करुन पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात पत्नीच्या डोक्यात जखम झाली असून दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत.
याप्रकरणी ५० वर्षाच्या पत्नीने अंलकर पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद दिली असून पोलिसांनी ५५ वर्षाच्या त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोथरुडमधील गोसावी वस्तीमध्ये (Gosavi Vasti Kothrud) मंगळवारी सकाळी सात वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पतीपत्नी आहेत. फिर्यादी यांचा पती नेहमी त्यांचे चारित्र्याचे संशयावरुन शिवीगाळ करुन मारहाण करत असे. मंगळवारी सकाळी त्याने जुन्या भांडणावरुन व चारित्र्याच्या संशयावरुन त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. त्यांच्या डोक्यात टाके पडले आहेत. तसेच या मारहाणीत त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले असून उजव्या पायाचे गुडघ्याचे वाटीस मार लागला आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.