Prakash Ambedkar On Sharad Pawar | मनोज जरांगेंना शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

sharad pawar-prakash ambedkar

एन.पी.न्यूज ऑनलाईन – Prakash Ambedkar On Sharad Pawar | वंचित बहुजन आघाडीचे Vanchit Bahujan Aghadi (VBA) नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर आरोप केला आहे की, पवार मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Assembly Election 2024) पवार मराठा समाजाला (Maratha Samaj) ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरूध्द ओबीसी वाद राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीला आमाचा पाठिंबा आहे, पण इतर लहान समाजानांही सोबत घ्यावं, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. यावरूनच आंबेडकरांनी आरोप केला आहे.

आंबेडकरांनी म्हटले आहे की, हे आता स्पष्ट झाले आहे की, शरद पवार जरांगे पाटील यांच्याबरोबर आहेत. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीला शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यासाठी ते निवडणुकीनंतर प्रयत्न करतील. असं वाटतयं.

आंबेडकरांना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

आंबेडकरांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले की, त्यांनी आरोप केला म्हणजे तसं होत असं नाही. जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या सरकारकडे मागत आहे. सरकार त्याबाबतीत लवकर निर्णय घेत नाही. जरांगेंचं आंदोलन असो किंवा ओबीसी समाजाचं लोकांचे आंदोलन असो, सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असंतोषाची लाट आहे. असं असताना कोण कोणाच्या जवळ आहे असे निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणे चुकीचं आहे.