Kothrud Assembly | कोथरूड विधानसभा: ‘जनसंवाद’ दौऱ्या दरम्यान भाजप नेते अमोल बालवाडकर यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद; रहिवाशी म्हणाले – ‘आगामी विधानसभेला आमचा पूर्ण पाठिंबा आपल्याला राहील’

पुणे : Kothrud Assembly | कोथरुड विधानसभा मतदारसंघात ‘जनसंवाद’ दौऱ्या दरम्यान भाजप नेते (BJP Leader) अमोल बालवाडकर (Amol Balwadkar) यांनी परिसरातील बालेवाडी येथील मंत्रा मोनार्क सोसायटी (Mantra Monarch in Balewadi Pune) येथे भेट दिली.
या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून थेट सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व विविध प्रश्न अमोल बालवाडकर यांनी जाणून घेतले. यावेळी पुणे मनपा संदर्भातील कामे, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, विविध शासकीय कामे आणि कागदपत्रे संबंधित अडचणी तसेच सोसायटी आणि परिसरातील भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अमोल बालवाडकर यांनी आश्वस्त केले.
विशेष म्हणजे यावेळी नागरिकांनी बालवाडकर यांचे स्वागत करून आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे सांगून आगामी विधानसभेला आमचा पूर्ण पाठिंबा आपल्याला राहील असे स्पष्ट केले. दरम्यान, नगरसेवक म्हणून जी विकासकामे प्रभागात मार्गी लावली, त्याच विकासक वाटचालीने कोथरूड मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेन अशी ग्वाही बालवाडकर यांनी सर्वांना दिली. तसेच माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार त्यांनी मानले.