Kondhwa Pune Crime News | पुणे : कोंढव्यात हॉटेलमध्ये पुन्हा हुक्का पार्लर ! मॅश हॉटेलवर पोलिसांची कारवाई, मालकासह ५ जणांवर FIR

पुणे : Kondhwa Pune Crime News | कोंढव्यात गेल्या महिन्यात एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर (Hookah Parlour In Kondhwa Pune) चालू असल्याचे आढळून आल्यानंतर आता पुन्हा एकदा मॅश हॉटेलमध्ये (Mash Hotel Kondhwa) खुले आम हुक्का पार्लर सुरु असल्याचे दिसून आले आहे. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) या हॉटेलवर कारवाई करुन ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील राहुल रासगे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हॉटेल मालक अली ईरानी (वय ६६, रा. होले हाईटस सोसायटी, उंड्री), हॉटेल मॅनेजर अली सय्यद (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), हुक्का भरणारे थॉमस सुजय मंडल (वय ३०, रा. उंड्री, मुळे प. बंगाल), रंजन समर्थ पत्रा (वय २७, रा. मॅश हॉटेल, उंड्री), राजकुमार वामन पंडीत (वय ३०, रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे (API Lekhaji Shinde), पोलीस उपनिरीक्षक गावडे, हवालदार हिरवे, पोलीस अंमलदार चिंचकर, राहुल रासगे हे पेट्रोलिंग करत कडनगर येथे आले होते. त्यावेळी पोलीस अंमलदार चिंचकर यांना बातमी मिळाली की, न्याती चौकाजवळील रायजिंग स्टार फुटबॉल क्लबचे शेजारील मॅश हॉटेल येथे अवैध रित्या हुक्का विक्री चालू आहे. पोलिसांनी रात्री येथे छापा घातला. त्यावेळी हॉटेलमध्ये ३ टेबलवर ८ जण हुक्का पित असल्याचे आढळून आले. हॉटेलमधील कॉटेज शेजारी असलेल्या छोट्या रुममध्ये आणखी काचेचे ४ छोटे हुक्का पॉट मिळून आले. पोलिसांनी हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य असा ३६ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे तपास करीत आहेत.