Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभेतून कोणाच्या हातात तुतारी असणार? काटे की कलाटे? राजकीय वर्तुळात चर्चा
चिंचवड : Chinchwad Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी यावेळी पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक त्यांनी चिन्हावर लढायचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) फिल्डिंग लावली असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. फक्त ते हाती तुतारी (Tutari) घेणार की मशाल (Mashal) हाती घेणार, याबाबतची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
दुसरीकडे भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) यांच्यासह भाजपमधील शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap), शत्रुघ्न काटे (Shatrughan Kate), चंद्रकांत नखाते (Chandrakant Nakhate) आदी इच्छुक उमेदवार आहेत. असं असताना महायुती (Mahayuti) मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नाना काटे (Nana Kate) हे देखील इच्छुक आहेत. ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मात्र ही जागा भाजपला सुटेल अशी शक्यता आहे. त्यामुळे नाना काटे हे शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) जाण्यासाठी चाचपणी करत असल्याची चर्चा आहे.
नाना काटे यांनी ही जागा भाजपला गेल्यास योग्य तो निर्णय घेऊन अपक्ष किंवा इतर पक्षातून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. म्हणजे राहुल कलाटे आणि नाना काटे हे आगामी काळात तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.