Pune Accident News | भरधाव मोटारसायकल स्लीप होऊन चालकाचा मृत्यु; तळजाईतील घटना

पुणे : Pune Accident News | भरधाव वेगाने जात असताना मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ती स्लीप होऊन त्यात चालकाचा मृत्यु झाला. कुणाल सूर्यकांत बडदे (वय २४, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ – Sadanand Nagar Mangalwar Peth Pune) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात तळजाई येथील सदु शिंदे स्टेडियमजवळ शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडला.
याबाबत पोलीस अंमलदार राहुल हजारे यांनी सहकारनगर पोलिसांकडे (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे. कुणाल बडदे हा मोटारसायकलवरुन भरधाव जात होता. सदु शिंदे स्टेडियमजवळ त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. मोटारसायकल स्लीप झाल्याने त्यात तो जबर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. पोलीस अंमलदार व्ही़ आर एडके तपास करीत आहेत.