Kondhwa Pune Crime News | पेट्रोलला पैसे न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील कडनगरमधील घटना

Crime Logo

पुणे : Kondhwa Pune Crime News | फोन उचलला नाही, पेट्रोलसाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरुन धारदार शस्त्राने मारहाण करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत योगेश रामदास लोंढे (वय २८, रा. सोमेश्वर सोसायटी, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अरबाज अरिफ सय्यद (वय २८, रा. कुबेरा कॉलनी, एनआयबीएम रोड, कोंढवा – NIBM Road Kondhwa) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कडनगर चौकातील एस टायर पंक्चरचे दुकानासमोर रविवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एस टायर पंक्चरच्या दुकानात पंक्चर काढून घेत होते. अरबाज सय्यद याने फिर्यादी यांच्याकडे पेट्रोलसाठी पैसे मागितले होते. ते देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला होता. त्याने २१ सप्टेबर रोजी फिर्यादी यांना फोन केला होत., तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे अरबाज सय्यद याच्या मनात राग होता. फिर्यादी हे पंक्चर काढून घेत असताना अरबाज तेथे आला. त्याने फिर्यादीच्या डोक्यात, उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हे जखमी झाल्यानंतर अरबाज हा पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.