Maval Assembly Constituency | मावळात राजकारण रंगलं, “भाजप तुतारीचा प्रचार करणार”, सुनील शेळकेंचं वक्तव्य; तुतारी चिन्हावर कोण लढणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Ajit Pawar-Devendra Fadnavis

मावळ : Maval Assembly Constituency | भाजप (BJP) आणि शिंदे शिवसेना (Shivsena Shinde Group) सहभागी असलेल्या महायुतीत (Mahayuti) राष्ट्रवादी अजित पवार गटाची (Ajit Pawar NCP) एन्ट्री झाल्याने आता विधानसभेच्या जागावाटपावरून (Maharashtra Assembly Election 2024) भाजपची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. एकाच मतदारसंघात एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने त्या त्या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता वाढलेली आहे.

दरम्यान मावळ विधानसभेत भाजप गावोगावी फिरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही, असा प्रचार करत आहेत. पण शरद पवारांनी उमेदवार उभा केला तर हे तुतारीचा (Tutari) प्रचार करण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांशी बोलताना सुनील शेळके म्हणाले, “भाजप पक्षाची काही मंडळी गावागावात जाऊन सांगत आहे, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना मदत करायची नाही, असे म्हणत आहेत. जे मागच्या दीड वर्षांपासून कधीही बोलले नाहीत. लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्ष महत्त्वाचा आहे, अजित पवारांचे काम चांगले आहे, आमदारांचे काम चांगले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत आल्याने ताकद मिळणार आहे, आपण सर्वांनी महायुतीचा धर्म पाळून काम केले पाहिजे. हे जे लोकसभा निवडणुकीला जे बोलत होते. ते आता अजितदादाला मदत करायची नाही हे गावागावात जाऊन सांगत आहेत.

ते पुढे म्हणाले, ” भाजपने कार्यकर्त्यांना भडकावून द्यायचं. त्यांना संभ्रमित करायचं.आपण पक्षाचे कसे निष्ठावंत आहोत, ते दाखवून द्यायचं, अजून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला मदत झाली पाहिजे हा एक त्यांचा प्रयत्न असणार आहे, असं माझं मत आहे, असे सुनील शेळकेंनी म्हटलं आहे. दरम्यान मावळात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे.