Karve Nagar Pune Crime News | पुणे : अनैतिक संबंधातून पत्नीनेच केला बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीचा खून

Murder Due To Immoral Relationship

पुणे : Karve Nagar Pune Crime News | मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरलेल्या चोरट्यांनी चालकावर वार करुन त्याची हत्या केली. घरातील दागिने, रोख रक्कम, किंमती वस्तू लुटून नेल्या. प्रथम दर्शनी हा दरोडा असल्याचे दिसून येत होते. वारजे पोलिसांनी केलेल्या तपासात हा दरोड्या केवळ बनाव असून अनैतिक संबंधातून (Murder Due To Immoral Relationship) पत्नीनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) पत्नी आणि बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. (Karve Nagar Murder Case)

अमोल पंढरीनाथ निवगुंने (वय ४२, रा. फुलश्री सोसायटी, कर्वेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. अमोल निवगुंने हे एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुली व पत्नी असा परिवार आहे.

याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास निवगुंने यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजविला. अमोल यांनी दरवाजा उघडताच आरोपी घरात शिरले. त्यांनी अमोल यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात अमोल पडले असतानाच आरोपींनी घरातील दागिने, रोख रक्कम, किमती वस्तू लुटून नेल्या, असे अमोल यांच्या पत्नीने सांगितले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस व गुन्हे शाखेचे (Pune Crime Branch) पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी घरातील एकंदर परिस्थिती पाहिल्यावर त्यांच्या पोलिसी नजरेला काही बाबी खटकल्या. त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात करताच खरा प्रकार समोर आला. पोलिसांनी बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. पत्नीने बॉयफ्रेडच्या मदतीने पतीचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांनी सांगितले.