Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | ‘काँग्रेस किती बेईमान आहे हे आता ठाकरेंना कळले असेल’, चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले – ‘त्यांची लढाई ही केवळ मुख्यमंत्रीपदासाठीच…’

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray

नागपूर : Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) मुख्यमंत्री करायचे आहे तर काँग्रेसमधून नाना पटोले (Nana Patole) व बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत.

महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) लढाई ही केवळ मुख्यमंत्रीपदासाठीच आहे व त्यावरूनच त्यांच्यात धुसफूस आहे. मात्र महायुतीकडून राज्यात डबल इंजिन सरकार यावे व राज्याचा विकास व्हावा यासाठी निवडणूकीची तयारी सुरू आहे”, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत. त्यांनी ठाकरेंचा वापर करून घेतला आहे. ठाकरे ते काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दिल्लीत भेटले. मात्र कुणीही त्यांना गंभीरतेने घेतले नाही. काँग्रेस किती बेईमान आहे हे उद्धव ठाकरेंना आता कळले असेल, असे बावनकुळे यांनी म्हंटलं.

नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या एका वक्तव्यावरून वाद सुरू आहे. प्रत्यक्षात त्यांनी अकोल्यातील व्हिडीओ बाबत वक्तव्य केले होते. जनतेच्या भावना भडकविणारे व्हिडीओ काही जण जाणुनबुजून टाकत आहेत. राणे यांनी अशा तत्त्वांवर भाष्य केले. देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांच्या नेते-पदाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात वक्तव्ये करू नयेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. महायुतीत समन्वय रहावा हाच सर्वांचा प्रयत्न आहे. खा. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणाविरोधातील वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.