Pooja Chavan Death Case | पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीला कोर्टात विरोध; पूजाच्या कुटुंबियांकडून कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट

मुंबई : Pooja Chavan Death Case | पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी पार पडली. ही सुनावणी न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Judge Devendra Kumar Upadhyaya) आणि न्यायमूर्ती अमित बोरकर (Judge Amit Borkar) यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यावेळी दिवंगत पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण (Lahu Cahvan) यांनी या प्रकरणात आपली कोणतीही तक्रार नाही. सीबीआय चौकशी (CBI Probe In Pooja Chavan Death Case) करण्याची आपली कोणती मागणी नसल्याचे त्यांचे बाजू मांडणारे वकील प्रणव बडेका (Adv Pranav Badheka) यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.

राज्याचे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ (Birendra Saraf) आणि पुणे पोलिसांची (Pune Police) बाजू मांडणारे उच्च न्यायालयाचे सरकारी वकील हितेन वेणेगावकर (Adv Hiten Venegaonkar) यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या याचिकादारांच्या मागणीला विरोध केला.

फेब्रुवारी २०२१ मध्ये पुण्यात पूजा चव्हाण हिचा इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. त्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करुन त्या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी, अशी मागणी केली होती.

चित्रा वाघ यांची बाजू मांडणारे वकील अनिल साखरे (Adv Anil Sakhare) यांनी याप्रकरणी काही क्लिप्स न्यायालयासमोर सादर केल्या. त्यामध्ये पूजा आणि राज्याच्या राजकारणातील उच्चपदस्थ व्यक्तीमध्ये काहीतरी घडत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

मृत्यू समयी पूजा गरोदर असल्याची चर्चा असल्याने तिच्या आत्महत्या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणात अन्य हस्तक्षेप याचिका दाखल असल्याने आणि ते आज उपस्थित नसल्याने ही सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे.