Mahayuti News | महायुतीतला वाद दिल्ली दरबारी सोडवला जाणार; राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तक्रार; वादग्रस्त विधानावर आक्रमक भूमिका

Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-3

मुंबई : Mahayuti News | विधानसभा निवडणुका तोंडावर (Maharashtra Assembly Election 2024) आलेल्या असताना महायुतीतील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहे. याबाबत आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने (Ajit Pawar NCP) आक्रमक भूमिका घेतली आहे. वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांची तक्रार आता दिल्लीत वरिष्ठांकडे केली जाणार आहे.

वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांमध्ये शिवसेना शिंदे गटातील (Shivsena Shinde Group) संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), तसेच भारतीय जनता पक्षातील आमदार नितेश राणे (Nitesh Rane), खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) हे नेते आघाडीवर आहेत.

वादग्रस्त विधानामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळत आहे. तसेच सामान्य नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेत अशा नेत्यांची तक्रार दिल्ली दरबारी करण्याचे ठरवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मूळ मतदार आहे, त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाचा समावेश आहे. अजित पवार आपल्या भाषणांमधून वारंवार आपण अल्पसंख्याक समाजाच्या (Minority Community) बाजूने आहोत, असा विश्वास देत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्याकडून सातत्याने मुस्लीम समाजाला अंगावर घेणारी वक्तव्यं आणि आव्हान देण्याची भाषा केली जात आहे.

अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मुस्लीम समाजाविषयीच्या (Muslim Samaj) वक्तव्यांबाबत अजित पवार यांची भूमिका काय, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल पटेल (Praful Patel) हे भाजप पक्षश्रेष्ठींशी (Senior BJP Leaders) चर्चा करुन ही बाब त्यांच्या कानावर घालणार आहेत.

भाजप नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष द्यावे, असे अजित पवार गटाकडून सांगितले जाणार आहे. या माध्यमातून आपण अजूनही मुस्लीम मतदारांच्या पाठीशी आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी अजित पवार गट करत असल्याचे बोलले जात आहे.