Yerawada Pune Crime News | 70 वर्षाच्या भावजयीच्या अंगावर 60 वर्षाच्या दीराने गरम तेल फेकले; पाठीवर केले चाकूने वार

Pune Crime News | Minor girl raped and murdered, unknown persons set fire to the tractor in front of the murderer's house, also set fire to the house, tense situation in the village

पुणे : Yerawada Pune Crime News | घरगुती वादातून ७० वर्षाच्या भावजयीच्या अंगावर ६० वर्षाच्या दीराने गरम तेल फेकले असून त्यांच्या पाठीवर चाकूने वार (Stabbing Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी लक्ष्मी सुधाकर कदम (वय ७०, रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, येरवडा) यांनी येरवडा पोलिसांकडे (Yerawada Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौतम नामदेव कदम (वय ६०, रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार त्यांच्या राहत्या घरासमोर सोमवारी दुपारी चार वाजता घडला. (Attempt To Murder)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. शिवण क्लासचा समारंभ आंबेडकर सोसायटीमध्ये होता. कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी या घरी जात होत्या. घरासमोर आल्या असताना घरगुती वादाचा राग मनात धरुन त्यांचा दीर गौतम कदम याने त्यांच्या अंगावर गरम तेल फेकले. त्यानंतर त्यांच्या पाठीवर चाकूने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक टकले तपास करीत आहेत.