Shivaji Nagar Pune Crime News | गणेश मंडळातील धातूची पंचारती, ताम्हणासह साहित्या चोरणार्या चोरट्यास अटक
पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | शिवाजीनगर गावठाणातील गणेश मंडळाच्या मंडपातील पितळी धातूची पंचारती, ताम्हण, गडवा असे साहित्य चोरुन नेणार्या चोरट्यास शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) अटक केली आहे.
सचिन दिगंबर वर्हाडे (वय ४६, रा. गुंडाचा गणपती शेजारी, कसबा पेठ) असे या चोरट्याचे नाव आहे.
याप्रकरणी प्रणव मेमाणे (वय २५, रा. शिवाजीनगर गावठाण) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १५ सप्टेबर रोजी रात्री सव्वा नऊ ते १६ सप्टेबर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली होती. (Arrest In Theft Case)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर गणेश मंडळ व शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट, गणपती चौक गावठाण या गणेश मंडळातून पितळी धातूची पंचारती, तांबे, ताम्हण, गडवा असा ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या चोरीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणावरुन सचिन वर्हाडे याला अटक केली आहे. पोलीस अंमलदार जाधव तपास करीत आहेत.