Puja Chavan Death Case | शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून कोर्टात जनहित याचिका

मुंबई : Puja Chavan Death Case | ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी (Demand CBI Probe In Puja Chavan Death Case) करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट आणि सीडीआर रिपोर्ट उघड करा अशी मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.
पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क (Heaven Park in Kondhwa) या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील रुमच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये तत्कालीन मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले होते. हे प्रकरण भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उचलून धरले होते.
दरम्यान, संजय राठोड हे महायुतीत (Mahayuti Govt) सहभागी झाल्यानंतर भाजपच्या आणि चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची काहीच चर्चा नव्हती मात्र आता ऐन विधानसभेच्या तोंडावर ही सीबीआय चौकशी करणारी जनहित याचिका दाखल केल्यामुळे राठोड यांच्या अडचणी वाढू शकतात.