Firing In Front Of Phoenix Mall Wakad | गणेश विसर्जनाच्या दिवशीच फिनिक्स मॉलच्या गेटवर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद (CCTV Video)

पिंपरी: Firing In Front Of Phoenix Mall Wakad | शहरात गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरु असताना फिनिक्स मॉलच्या गेटवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. वाकड परिसरातील फिनिक्स मॉलच्या गेटवर एकाने बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने केलेला गोळीबार कॅमेरात कैद झाला आहे. (Wakad Police)

मिळालेल्या माहितीनुसार, फिनिक्स मॉलजवळ एक व्यक्ती चारचाकी वाहनातून उतरला. त्यानंतर फिनिक्स मॉलच्या गेट नंबर सातच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मॉलच्या गेट समोर उभं राहून अज्ञात व्यक्ती गोळीबार करताना सीसीटीव्हीत दिसत आहे.

सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झालेला नाही. तरी गणपती विसर्जनाच्या दिवशी मॉलच्या गेटवर गोळीबार झाल्याने पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे. अज्ञात व्यक्तीने गोळीबार का केला? हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.

गणेश विसर्जन मिरवणूक पुणे व्हिडिओ –