Chandarakant Patil On MH Election 2024 | ‘महायुती जिंकणार 170 जागा’, भाजपच्या बड्या नेत्यानं सांगितलं आकड्यांचं गणित

Chandrakant-Patil-1 (1)

पुणे : Chandarakant Patil On MH Election 2024 | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) लगबग सुरु झालेली आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, बैठकांचा जोर वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला म्हणावे असे यश मिळाले नव्हते. त्यामुळे आता महायुतीने कंबर कसली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. त्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महायुतीचं सरकार (Mahayuti Govt) आणण्यासाठी बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि आमचं कर्तृत्व देखील आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आमची पीछेहाट झाली, असे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र, त्या निवडणुकीमध्ये आम्ही १३० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहोत. त्यामुळे बहुमतासाठी दहा-बारा जागांचा प्रश्न आमच्या पुढे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, १० लाख तरुणांना एक वर्ष अप्रेंटिसशिपची योजना सुरू करण्यात आली, मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ते पुढे म्हणाले, तीन गॅस सिलिंडर मोफत असतील अथवा शेतकऱ्यांची विज बिल माफीचा निर्णय असेल, लोकसभा निवडणुकीनंतर सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना लागू करण्यात आल्या आहेत. यामुळे जी आघाडी १३० जागांवर लोकसभेला होती, ती विधानसभेला १७० जागांपर्यंत गेल्याचे पाहायला मिळेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंबईमध्येही लोकसभेला महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मतं ही महायुतीला जास्त आहेत. दोन जागांवर आम्हाला थोड्याशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला. एक जागा १९ हजार ने तर दुसरी जागा २९ हजार मतांनी गमवावी लागली. त्या जागा आल्या असत्या तर आम्ही चार आणि ते दोन असं समीकरण झालं असतं, असे त्यांनी सांगितले.