Ajit Pawar On Face Of Mahayuti CM | ‘विधानसभा निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वात मात्र मुख्यमंत्री…’, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

Ajit-Pawar-On-Eknath-Shinde (1)

पुणे : Ajit Pawar On Face Of Mahayuti CM | आगामी विधानसभेला (Maharashtra Assembly Election 2024) महायुती आणि महाविकास आघाडीचा (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाची चर्चा आहे तर महायुतीत सन्स्पेन्स आहे.

आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार हे पुण्यात गणपतीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री कोण होणार, यासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, “आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते. निवडणुकीत ज्या पक्षाला १४५ जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्री कोणाला करायचे याचा निर्णय जनतेच्या हाती असतो.

राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महायुतीचे सरकार आल्यानंतर तिन्ही पक्षातील नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील”, असे अजित पवारांनी सांगितले.