Sujay Vikhe – Balasaheb Thorat | विधानसभेला बाळासाहेब थोरातांना सुजय विखे देणार आव्हान; लोकसभेचा फटका विधानसभेला भरून काढणार?

Sujay Vikhe - Balasaheb Thorat

संगमनेर : Sujay Vikhe – Balasaheb Thorat | आगामी विधानसभेच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. लोकसभेला फटका बसल्यानंतर आता सुजय विखे पाटील विधानसभा लढविण्याच्या तयारीत आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून (Sangamner Assembly Constituency) निवडणूक लढवायला आवडेल, असे म्हणत त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. भाजपने याला हिरवा कंदील दाखवल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना होणार आहे.

‘पक्षाने आदेश दिल्यास संगमनेरमधून निवडणूक लढण्यास आवडेल. इतर मतदारसंघातून नको’, असे विधान सुजय विखे यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, ” भाजपाने आदेश दिला आणि जर पक्षाला ती जागा सुटली तर मला नक्कीच संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल. पक्षाचा जो काही आदेश असेल, त्यानुसार काम करत राहू.”

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुजय विखे पाटील राहता विधानसभा मतदार सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याबद्दल भूमिका मांडली होती.

मला आता वेळ आहे. शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्या मतदारसंघात माझ्या नावावर एकमत होईल तिथून निवडणूक लढण्यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हेच माझ्यासमोर पर्याय आहेत, असे सुजय विखे यांनी सांगितलं होतं.