Chhagan Bhujbal | ‘निवडणुकीनंतर सर्वांचे विमान खाली येईल’, भुजबळांचे वक्तव्य चर्चेत; मविआला की महायुतीला टोला? राजकीय वर्तुळात चर्चा

Chhagan-Bhujbal-3

येवला : Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. भुजबळ सध्या त्यांचा मतदार असलेल्या येवला मतदारसंघात आले असता त्यांनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांचे विमान जमिनीवर येईल. सध्या सर्वच जण हवेत आहेत. पण हे त्यांचे विमान विधानसभा निवडणुकीनंतर जमिनीवर येईल, असे विधान भुजबळांनी केले. (Maharashtra Assembly Election 2024)

भुजबळ हे महायुतीतले मोठे नेते आहेत. सध्या ते युती सरकारमध्ये मंत्री आहेत. लोकसभा निवडणूक त्यांना लढवायची होती. पण जागा न सुटल्याने त्यांना उमेदवारी ही मिळाली नाही. त्यानंतर राज्यसभेवरही त्यांना जाता आले नाही. त्यानंतर भुजबळ हे थोडे मतदार संघापुरते मर्यादित झाले. त्यांच्या भूमिकेला महायुतीतल्या घटक पक्षाने विरोधही दर्शवला. (Mahayuti Vs Mahavikas Aghadi)

दरम्यान आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विविध सर्व्हे समोर येत आहेत. त्यामध्ये आपणच पुढे असल्याचे जो तो पक्ष सांगत आहे. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने असे विविध पक्षाचे वेगवेगळे आकडे फिरणारच आहेत. सर्वच म्हणतात आम्ही पुढे आहोत. ज्यावेळी निवडणुकीचे निकाल लागतील, त्यावेळी सर्वांचे विमान खाली येईल अशी प्रतिक्रीया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

त्यामुळे हे विमान नक्की कोणाचे खाली येणार याची चर्चा सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीला हा टोला होता की महायुतीला हा टोला होता याचीच चर्चा सध्या सुरू झाली आहे.