Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी केली गणपतीची पूजा

मुंबई : Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणेश मंडळाला भेट देत पूजा केली. माझगावच्या अंजिरवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळालाही त्यांनी भेट दिली.
सोबतच, अजित पवार यांनी सिद्धिविनायक मंदिरात पूजाही केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर पोस्ट केले की, “मी गणेशाच्या चरणी सर्वांच्या सुख, यश, आर्थिक स्थैर्य आणि जीवनात भरभराटीसह राज्य आणि देशाच्या विकासासाठी प्रार्थना केली आहे.”