Aditya Thackeray At Bhau Rangari Ganpati | आदित्य ठाकरेंसह सुषमा अंधारे यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)
पुणे : Aditya Thackeray At Bhau Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे बाप्पांच्या दर्शनासाठी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, मनोरंजन, क्षेत्रातील मान्यवर याठिकाणी भेट देत बाप्पाचे दर्शन घेऊन आरती करीत आहेत.
दरम्यान आज (दि.१६) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे व उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत करून त्यांना सन्मानित केले.
शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. दरम्यान याठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो आहे.