Shivsena UBT On Nitin Gadkari | गडकरींच्या PM पदाच्या ऑफरच्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून निशाणा; म्हणाले – “पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी विरोधकांचा वापर…”

मुंबई : Shivsena UBT On Nitin Gadkari | विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. गडकरींच्या या विधानावर आता ठाकरे गटाकडून तिखट प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) म्हणाल्या, नितीन गडकरी हे त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी विरोधकांचा वापर करत आहेत. इंडिया आघाडीकडे (India Aghadi) देशाचे नेतृत्व करू शकतात असे सक्षम नेते आहेत. त्यामुळे गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर देण्याची गरज नसल्याचं चतुर्वेदी यांनी सांगितलं.
प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय की, नितीन गडकरी त्यांची दिल्लीच्या खुर्चीवर बसण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षांच्या नावाने ते मोदींना (PM Narendra Modi) इशारा आपला मेसेज देत आहेत. भारत आघाडीकडे अनेक सक्षम नेते आहेत. ते देशाचे नेतृत्व करू शकतात. भाजपकडून कोणताही नेता उधार नको, असं म्हणत त्यांनी गडकरींवर हल्लाबोल केला आहे.
नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे सर्वमान्य नेते आहेत. पंतप्रधान पदासाठी तडजोड करा, असं त्यांना कोणी सांगितलं असेल असा मला वाटत नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.