Sharad Pawar | भाजप आमदार शरद पवारांच्या भेटीला; पवार म्हणाले – ‘तुम्ही दुसऱ्या पक्षाचे इथं कसे?’

धुळे : Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. दरम्यान आज शरद पवार धुळे दौऱ्यावर आहेत. अनेक तालुक्यांमध्ये ते शेतकरी मेळावे घेत आहेत. आज त्यांनी शिंदखेडा (Sindkheda) तालुक्यात शेतकरी मेळावा घेतला.
शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार विमानतळावर पोहोचले असता राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर भाजप आमदार अमरिश पटेलही (Amrish Patel) शरद पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, अमरिश पटेल स्वागताला आल्याचे दिसल्यानंतर शरद पवार म्हणाले, तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मग इथं कसे? यावर प्रत्युत्तर देताना अमरिश पटेल म्हणाले, पक्ष वगैरे काय असतो साहेब? दरम्यान, दोघांकडून मिश्किल टिप्पणी झाल्यानंतर त्या ठिकाणी हशा पिकलेला पाहायला मिळाला.