Sharad Pawar NCP | पुण्यातून विधानसभा लढण्यासाठी तब्बल 41 अर्ज; राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? उत्सुकता वाढली
![sharad-pawar-5-1](https://i0.wp.com/npnews24.com/marathi/wp-content/uploads/sites/2/2024/08/sharad-pawar-5-1.webp?resize=640%2C360&ssl=1)
पुणे : Sharad Pawar NCP | लोकसभेला राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चांगले यश मिळाल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादीत बंड होऊनही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १० पैकी ८ उमेदवार निवडून आले. त्यामुळे आता विधानसभेला तुतारी (Tutari) चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक लढण्यासाठी पुण्यातून तब्बल ४१ जण इच्छुक आहेत. इच्छुक उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम पक्षाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सुचनेनंतर शहरातील आठही विधानसभा मतदार संघातुन निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. पक्षाकडून १० सप्टेंबर पर्यंत इच्छुकांना अर्ज पाठविण्यासाठीची मुदत देण्यात आली होती.
त्यानुसार दिलेल्या मुदतीत ४१ जणांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. संबंधित उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.