PM Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; जाहीर सभाही होणार असल्याची माहिती; शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

पुणे : PM Modi Pune Visit | राज्यात विधानसभा निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात (Maharashtra Assembly Election 2024). दरम्यान सर्वच पक्षांनी त्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा (PM Modi Pune Tour) असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.
शिवाजीनगर-स्वारगेट मार्गाच्या मेट्रोचे (Shivaji Nagar To Swargate Metro Route) काम पूर्ण झाले असून स्वारगेट ते कात्रज या मार्गाला मान्यता मिळाली आहे (Swargate To Katraj Metro). भूमिगत मार्गाचे आणि नव्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन आहे.
शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर (SP College Ground) त्यांची सभाही होणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मोदी यांच्या पुण्याच्या २७ सप्टेंबरच्या दौऱ्याबाबत मुख्य सचिवांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्तांची बैठक घेतली होती. त्यात दौऱ्यातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) यांनी गुरुवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. दौरा अंतिम झाल्यानंतर आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.