Pune Crime Branch News | गांजा विक्री करण्यासाठी आलेले दोघे अटकेत

पुणे : Pune Crime Branch News | गांजा विक्री करण्यासाठी आपल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक – २ ने अटक केली आहे. सुमेर सादिक तांबोळी (२६) आणि विकास बाळू बनसोडे (३४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३८ किलो ८७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. (Ganja Selling Case)
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार, अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्य्क आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप जाधव, साहिल शेख, अझीम शेख, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली आहे.