Maharashtra Assembly Election 2024 | एमआयएमचा मविआसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव; एक ही बैठक झाली नसल्याचा दानवेंचा दावा

एन.पी.न्युज ऑनलाईन : Maharashtra Assembly Election 2024 | एमआयएमने (MIM) उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतू विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एमआयएम ही विघातक शक्ती आहे. महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) एमआयएमची एकही बैठक झाली नसल्याचं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने ठाकरे गटाच्या उमेदवारांना भरभरुन मतदान केल्याचं बोललं जातं. भाजपांकडूनही (BJP) उध्दव ठाकरेंवर टिका करताना मुस्लीम मतांच्या जीवावर खासदार निवडून आलेत असं सातत्याने म्हटलं जातं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुस्लीम उमेदवार देण्याची चर्चा जोर धरु लागली आहे. याबाबत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले की, माझ्यासोबत बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं असेल, की छोट्या मोठ्या नेत्यांना या आघाडी प्रवेशाबाबत सांगू नका. मलाही त्या नेत्यांची नावं सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र ते अंबादास दानवेंपेक्षा मोठे नेते आहेत. सध्या प्राथमिक चर्चा सुरु असून त्या बाहेर सांगण्याची गरज नाही, असं एमआयएम नेते इम्तियाज जलील म्हणाले.
मुस्लीम उमेदवार फक्त दाखवण्यासाठी नको, त्यांना निवडून आणा
जलील म्हणाले की, उद्धव ठाकरे मुस्लीम उमेदवार देणार ही आनंदाची गोष्ट आहे. लोकसभेला त्यांनी एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही, मात्र लोकांनी भाजपच्या विरोधात जाऊन, आम्हाला केंद्रात मोदी सरकार नको, म्हणून महाविकास आघाडीला मतदान केलं. ही गोष्ट उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसच्या नेत्यांना चांगलीच समजली आहे. ही परिस्थिती विधानसभेला उद्भवणार नाही. त्यामुळे आधीच त्यांनी ओळखलं की मुस्लीम मतं हवी असल्यास उमेदवार द्यावे लागतील. मात्र फक्त दाखवण्यासाठी नको, त्यांना निवडून आणा, अशी भूमिका जलील यांनी घेतली.
ठोस सांगा, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढण्यास मोकळे
मला एमआयएमकडून लिखित प्रस्ताव हवाय, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कधीच सांगितलं नाही. तसं असतं तर आधीच पाठवला असता. पण हो किंवा नाही ठोस सांगा, उडवाउडवीची उत्तरं नकोत. मीडियाच्या माध्यमातून समजलं वगैरे नको. अन्यथा आम्ही प्रक्रिया सुरु केली आहे, आम्हीही स्वतंत्र लढण्यास मोकळे आहोत. कन्नड, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम या पाच मतदारसंघापैकी कुठेही मी लढू शकतो, असे जलील म्हणाले.